1) एखाद्या शब्दावर लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला----- म्हणतात.
1) उपकार होणे. 2) विकार होणे
3) अपकार होणे 4) बदल होणे
2) खालील विधाने लक्षात घ्या.
अ)व्याकरणामध्ये ‘वस्तू’ म्हणजे डोळ्यांना दिसणारे सर्व घटक व काल्पनिक घटक अशा सर्वांचा समावेश होतो.
ब) ‘वस्तू' म्हणजे-फक्त दैनंदिन जीवनात वापरात असलेले घटक.
1) फक्त अ बरोबर 2) फक्त ब बरोबर
3) दोन्ही चूक 4) दोन्ही बरोबर
3) वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना असे म्हणतात.
1) सर्वनाम 2) नामरूपे
3) नामे 4) विशेषणे
4) सामान्यनामाचे अनेकवचन होऊ शकते; परंतु विशेषनामाचे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. हे विधान
1) सत्य आहे 2) असत्य आहे
3) अर्धसत्य आहे 4) सांगता येत नाही
5) खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे?
1) नकट्या मुलीच्या लग्नाला सतराशे विघ्ने.
2) दुष्ट माणसांचा शेवट नेहमी वाईटच होतो.
3) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
4) भित्र्या माणसापाठी ब्रह्मराक्षस.
6) खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा सामान्यनामा
प्रमाणे उपयोग केलेला नाही?
1) आज आम्हाला प्रत्येक घराघरात शिवाजी हवेत.
2) आमच्या शेजारच्या लक्ष्मी काकू म्हणजे आनंदीबाईच.
3) आजकाल खिशात चार पैसे काय आले; प्रत्येक जण
स्वतःला बाजीराव समजू लागला.
4) नेपोलियनची कूटनीती सर्वपरिचित आहे.
7) अयोग्य विधाने ओळखा.
अ) कर्ता व कर्म नेहमी नामच असते.
ब) धातुसाधितांचा उपयोगसुद्धा नामाप्रमाणे होतो.
क) विशेषणाचा उपयोग नामाप्रमाणे होत नाही.
ड) अव्ययसाधित नामे ही अव्ययांपासून तयार केलेली असतात.
1) अ 2) ब
3) क 4) ड
8) नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?
1) अविकारी 2) विकारी
3) एकवचनी 4) अनेकवचनी
9) पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा
विशेषनामासारखा उपयोग केला आहे?
1) मी आत्ताच नगरहून आलो.
2) आमची बेबी आता कॉलेजात जाते.
3) माधुरी उद्या मुंबईला जाईल.
4) शेजारची तारा यंदा बी. ए. झाली.
10) 'तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.
'या विधानातील अधोरेखित शब्दाच्या नामाचे कार्य ओळखा.
1) विशेषनाम 2) सामान्यनाम
3) सर्वनाम 4) नाम
11) पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता?
1) श्रीमंती 2) शांतता
3) सौंदर्य 4) चांगली
12) सुयोग्य शब्दजाती ओळखा :
अ) सामान्यनाम - शाळा, सोने, दूध, साखर
ब) विशेषनाम - नलिनी, हरि, हिमालय, गंगा
क) भाववाचक नाम - कीर्ती, वात्सल्य, वार्धक्य, उड्डाण
ड) धातुसाधित नाम - कर, वागणे, हसू, देणाऱ्याने
1) अ आणि ब 2) अ,
ब आणि क
3) अ,
क आणि ड 4) वरील सर्व
13) 'उदार' या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी | कोणते प्रत्यय उपयोगात येतात?
1) य,
ता. 2) ई,
त्व
3) ई,
पणा 4)
य, ई
14) 'गुलामगिरी' हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?
1) सामान्यनाम 2)
भाववाचक नाम
3) पदार्थवाचक नाम 4) समूहवाचक नाम
15) “कुत्र्याने” चावा घेतला?
अधोरेखित शब्दाचे नाम कोणते?
1) कुत्र्या 2) कुत्रा
3) कुत्र्याने 4) कुत्र्याचा
16) पदार्थवाचक नावे ओळखा.
1) कलप,
वर्ग, सैन्य,
घड
2) स्वर्ग,
देव, अप्सरा,
नंदनवन
3) दूध,
साखर, कापड,
सोने
4) पुस्तके,
चेंडू, कागद,
लेखणी
17) 'गोड' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
1) गोडवा 2) गोड
3) मधुर 4) रसाळ
18) पुढील विधाने पहा.
अ)नामाच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्यनामाचेच अनेकवचन होते.
ब) विशेषनाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेकवचन होत नाही.
1) अ बरोबर, ब चूक 2)
अ चूक,
ब बरोबर
3) दोन्ही चूक 4) दोन्ही बरोबर
19) ' वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो' या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा.
1) वर्ग 2) विनोद
3) नेहमी 4) दांडगाई
20) पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती?
1) मधुरिमा,
स्वागता 2)
स्वाधीन, नलिनी
3) धैर्य,
आनंद 4)
सह्याद्री आशा
21) पुढील शब्दातील 'अनेकवचनी' शब्द ओळखा :
1) फूल 2) मोत्ये
3) मूल 4) जळू
22) तुमच्या वडिलांचा उल्लेख करताना कोणते वचन वापराल?
1) एकवचन
2) अनेकवचन
3) बहुवचन
4) आदरार्थी अनेकवचन
23) विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा
गुणधर्म म्हणजे......
1) आगम
2) वचन
3) संख्याविशेषण
4) समुदायवाचक नाम
24) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? (पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होत नाही)
1) चिपळी
2) खडावा
3) ज्वारी
4) प्रधानमंत्री
25) खालील शब्दातील अनेकवचनी रूप कोणते?
1) युवत्या
2) युवती
3) व्युत्या
4) यांपैकी नाही..