26) 'उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते?
(उंदीर शब्दाचे अनेकवचन होत नाही.)
1 ) उंदरे
2) उंदरांना
3) उंदीर
4) अनेकवचन उंदीरच आहे
27) 'दिवाळीत पणत्या लावतात. या वाक्यातील अधोरेखित
नामाचे वचन ओळखा.
1) एकवचन
2)
द्विवचन
3) बहुवचन
4)
अनाम वचन
28) पुढील शब्दांतील 'दासी'ला अनेकवचनी शब्द शोधा.
1) दासीया
2) दास्या
3) दासी
4) दासे
29) 'जळू' या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा.
1) जळा
2) जळे
3) जळवा
4) जळ्या
30) पुढील शब्दाचे अनेकवचन लिहा - सासू
1) सासू
2) सासवा
3) सासरा
4) सासु
31) खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा.
1) तळे
2) मळे
3) डोळे
4) गोळे
32) मला 'टाचण्या' आणून द्या. या वाक्यातील 'टाचण्या'चे
वचन ओळखा.
1) एक वचन
2) उभय वचन
3) अनेकवचन
4) यांपैकी नाही
33) 'चूक' या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा.
1) चुकी
2) चूका
3) चुका
4) चूकी
34) पुढील शब्दांतील अनेकवचनी रूप ओळखा.
1) लेखणे
2) लेखक
3) लेखण्या
4) लेखी
35) पुढील शब्दांतील अनेकवचनी रूप ओळखा.
1) आज्ञे
2) आज्ञा
3) आज्ञी
4) आज्ञाने
36) रिकाम्या जागेसाठी सर्वांत अधिक योग्य शब्दाची निवड करा. घरामध्ये ठिकठिकाणी लावले होते.
1) आरशी
2) आरश्या
3) आरसे
4) आरशे.
37) रिकाम्या जागेसाठी सर्वांत अधिक योग्य शब्दाची निवड करा. अंजलीला दोन ........ आहेत.
1) मामे
2) मामू
3) मामा
4) यापैकी नाही.
38) खालील शब्दांतून अनेकवचनी शब्द ओळखा.
1) खेळणे
2) तळे
3) डबे
4) पातेले
39) खालील शब्दांतून एकवचनी शब्द ओळखा.
1) लाटा
2) झरा
3) चांदण्या
4) खाटा
40) 'चांदणी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
1) चांदण्या
2) चांद
3) चांदणे
4) चांदणा
41) सूचना : वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.
1) दरी
2) डोंगर
3) नदी
4) यांपैकी नाही
1) तळी
2) पोळी
3) जाळी
4) यांपैकी नाही
43) ज्या वेळी वस्तूंची खूप मोठी संख्या दाखवायची असते;
त्यावेळी एकवचनी शब्दप्रयोग करतात,
त्याला खालीलपैकी काय म्हणतात?
1) एकवचन
2) विपुलतादर्शक एकवचन
3) बहुवचन
4) आदरार्थी अनेकवचन
44) नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो,
त्याला असे म्हणतात.
1) वचन
2) संख्यावाचन
4) द्विवचन
3) बहुवचन
45) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन 'या' कारान्त होत नाही?
1) पोळी
2) पक्षी
3) वही
4) काठी
46) 'ती परीक्षा देते.' या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा.
1) सर्वनाम, एकवचनी, स्त्रीलिंग-कर्म
2) विशेषनाम, स्त्रीलिंगी, एकवचनी-कर्ता
3) सर्वनाम, स्त्रीलिंगी, एकवचनी-कर्ता
4) सर्वनाम, स्त्रीलिंगी, अनेकवचनी-कर्म
47) खालीलपैकी कोणते वाक्य आदरार्थी अनेकवचन दर्शविते?
1) गणू शाळेत गेला.
2) आई घरी आली.
3) कुत्रा झाडाखाली झोपला.
4) बाबा गावाला गेले.
48) खालीलपैकी कोणते वाक्य विपुलतादर्शक एकवचन दर्शविते.
1) खूप पेरू खाली पडले.
2) शबरीने बोरे वेचली
3) हे आंबे कच्चे आहेत.
4) यंदा जरा जास्तच पपई आली.
49) पर्यायी उत्तरांतून अचूक उत्तर शोधा. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात.
1) माणसे
2) घरे
3) डोहाळे
4) दारे
50) अनेकवचनी शब्द ओळखा.
1) बिया
2) गठ्ठा
3) कांदा
4) तारीख