1]
'कुत्रा' या नामाचे सामान्य रूप काय होईल?
१) कुत्री २) कुत्र्या
३) कुत्रे ४) कुत्रू
2]
'खेळ' या नामाचे सामान्य रूप काय होईल?
१) खेळ २) खेळे
३) खेळी ४) खेळू
3] ‘वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द भरा' चाचा नेहरू मुलां........मेळाव्यात रमून जात.
१) शी २) ने
३) च्या ४) ची
4]
'फडके' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?
१) फडक्यांनी २) फडक्यांचे
३) फडक्यांना ४) वरील सर्व?
5] 'भिंत' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते?
१) भिंत २) भिंता
३) भिंती ४) भिती
6]
'कुकू' या नामाचे सामान्य रूप काय होईल?
१) 'कुंकू' २) कुंकूव
३) कुंकवी ४) कुंकवा
7] कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा.
'माझ्या (अंगण) एक जांभळाचे झाड आहे'
१) अंगणाला २) अंगणाशी
३) अंगणाचे ४) अंगणात
8]
खालीलपैकी सामान्यरुप न होणारा शब्द कोणता ?
१) ग्रंथ २) सिंह
३) फोटो ४) मुलगी
9]
'पुस्तकांना' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?
१) पुस्तक २) पुस्तकां
३) पुस्तका ४) पुस्तके
10]
'शाळा' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते
१) शाळांना २) शाळांनी
३) शाळेत ४) शाळांचा
11]'सूर्य' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?
१) सूर्य २) सूर्यांनी
३) १ व २ ४) सूर्याचा
12]'डोळा' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?
1] डोळी २) डोळे
३) डोळ्याचा ४) वरील सर्व
13] विभक्ती प्रत्यय लागताना नामाच्या मूळ रूपाला जो विकार होतो किंवा नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला……. म्हणतात.
१) सर्वनाम २) सामान्य रूप
३) विशेषण ४) विभक्ती
14] पुढील शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
'झाडावर बसलेल्या चिमण्यांनी चिवचिवाट केला.'
१) चिमणा २) चिमण्यांनी
३) चिमणीने ४) यापैकी नाही
15]
'दोरा' या शब्दाचे खालीलपैकी सामान्यरूप कोणते ?
१) दोऱ्या २) दोर
३) दोरा ४) दोऱ्याने
16]
'बेडूक' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?
१) बेडकी २) बेडका
३) बेडकांनी ४) बेडकांना
17] पुढील दिलेल्या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. 'उंदीर'
१) उंदऱ्या २ ) उंदिरा
३) उंदरी ४) उंदीर
18]
'राजा' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?
१) राजा २) राज्या
३) राजे ४) राज्य
19]
'कवी' या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?
१) कव्या २) कवी
३) कवीला ४) कवीने
'माझ्या (अंगण) एक जांभळाचे झाड आहे.'
१) अंगणाला २) अंगणाशी
३) अंगणाचे ४) अंगणात
21) 'तारू' या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्यरूप कोणते?
१) तारू २) तारूस
३) तारवा ४) तारवास
22) (घोडा) रोज खरारा करावा. कंसातील शब्दाचे सामान्य रूप तयार करून चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्य
१) घोडाला २) घोड्याचा
३) घोड्याला ४) घोडला
23) जाईच्या वेलीला सुंदर फूल आहे. पुढील वाक्यातील सामान्य रूप ओळखा.
१) सुंदर २) वेलीला
३) जाईच्या ४) फूल
24) 'सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते' या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे ?
१) स्त्रीचे २) मोत्यांमुळे
३) अधिकच ४) खुलते
25) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा.
'सशाला चार पाय असतात.'
१) ससा २) सशा
३) सशाला ४) ससाला
26) विभक्तीप्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ?
१) प्रत्यय २) शब्दसिद्धी
३) अव्यय ४) सामान्य रूप
27) 'योगेश गावाहून आला.' या वाक्यातील अन्त्याक्षरयुक्त सामान्य रूप सांगा.
१) गावा २) योगेश
३) गावाहून ४) आला
28) खालील शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो? 'कुंकू'
१) 'आ' २) 'ऊ'
३) 'वा' ४) 'ए'
29) ‘हिरवा' या विशेषणास सामान्य रूपाचा झालेला विकार ओळखा. १) हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतो.
२) हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतोच असे नाही.
३) हिरव्या
भाजीपाल्याकडे कोणाचेही
लक्ष जाते.
४) हिरवा भाजीपाला चटकन विकला जातो
30] 'गाय' या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणता प्रत्यय लागून होते?
१) य २) आ
३) ए ४)
ई