शेवटी उत्तरे online Exam मध्ये आहेत
1) मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
1) मानव
2) माणूस
3) मनुष्यत्व
4) मानवी
2) आमची “तारा” आता कॉलेजात जाते.
1) विशेषनाम
2) सामान्यनाम
3) भाववाचक नाम
4) धातुसाधित नाम
3) खालीलपैकी भाववाचक नामांचा गट ओळखा.
1) औदार्य, शौर्य, क्रौर्य, धैर्य
2) राज्य, कृष्णा, सह्याद्री, पृथ्वी
3) शुक्र, चंद्र, ग्रह, महाराष्ट्र,
4) ओरड, माकड, बोकड, कापड
4) भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.
1) शांती 2) संत
3) खंत 4) प्रेम
5) सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.
1) खुशी 2) गरीब
3) वही 4) कीर्ती
6 ) भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा.
1) गरिबी 2) गरीब
3) गार 4) गोड
7) धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता?
1) पळणे 2) रडू
3) हसू 4) सत्य
8) दशरथाने कैकेयीला दोन ‘वर’ दिले.
अधोरेखित शब्द ओळखा.
1) नाम
2) सर्वनाम
3) क्रियाविशेषण
4) शब्दयोगी अव्यय
9) आमच्या वर्गात बरेच ‘नारद’ आहेत.
1) विशेषनाम
2) सामान्यनाम
3) भाववाचक नाम
4) धातुसाधित नाम
10) नामाच्या प्रकारातील…… या नामाचे अनेकवचन होते.
1) सामान्यनाम
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) धातुसाधित नाम
11) 'भोळा' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
1) भोळसर 2) भोळसट
3) भोळेपणा 4) भोळी
12)“श्रीमंताला” गर्व पैशाचा. ..
या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
1) नाम 2) सर्वनाम
3) धातुसाधित नाम
4) विशेषण
13)‘त्याच्या बोलण्यात 'परंतु'चा वापर फार होतो.'
या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे?
1) उभयान्वयी अव्यय
2 ) विशेषण
3) सर्वनाम
4) नाम
14) चांगले “खेळाडू” आजकाल घडत नाहीत.
1) धातुसाधित नाम
2) भाववाचक नाम
3) सामान्यनाम
4) सर्वनाम
15) “लोकमान्यांनी” स्वातंत्र्याची प्रेरणा दिली.
1) सामान्यनाम
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम.
4) धातुसाधित नाम
16) या वयात तुला असे “वागणे” शोभत नाही.
1) भाववाचक नाम
2 ) विशेषनाम
3) धातुसाधित नाम
4) सामान्यनाम
17) आशाताईच्या स्वरांतील “गोडवा” विलक्षण आहे.
1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम
4) धातुसाधित ना
18) 'सुलभा' हे कोणते नाम आहे?
1) विशेषना नाम
2) सामान्यनाम
3) सर्वनाम
4) भाववाचक नाम
19) 'प्रामाणिकपणा' कोणते नाम आहे?
1) सामान्यनाम
2 ) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) पदार्थवाचक नाम
20) पुढील शब्दांतील भाववाचक नाम ओळखा.
1) श्रीमंती
2) दरिद्री
3) गवई
4) कवयित्री
21) पुढील शब्दांतील भाववाचक नाम कोणते?
1) कळप 2) कीर्ती
3) रामा 4) घर
22) खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?
1) देवराष्ट्र 2) महाराष्ट्र
3) धृतराष्ट्र 4) परराष्ट्र
23) 'सौंदर्य' या शब्दाचा प्रकार ओळखा.
1) गुणविशेषण
2) भाववाचक नाम
3) शब्दयोगी अव्यय
4) सर्वनाम
24) वाल्मिकीने 'रामायण' हा ग्रंथ लिहिला.
या मधील रामायण या शब्दाची जात ओळखा.
1) कर्ता
2) कर्म
3) उभयान्वयी अव्यय
4) विशेषनाम
25) खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेषनाम कोणते ते सांगा.
1) श्रीलंका 2) राष्ट्र
3) गाय 4) दिशा
26) अधोरेखित शब्दाची जात ओळखा—
* त्याचे “बोलणे” मनाला लागले आहे.
1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम
4) धातुसाधित नाम
27) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा
“गरिबांना” सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे.
1) नाम 2) विशेषण
3) उभयान्वयी
4) केवलप्रयोगी