1) 11 ते 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती?
1) 875 2) 905
3) 955 4) 845
2) 'x' ही एक विषम संख्या आहे, तर 'x' च्या पुढील क्रमाने येणारी 15 वी समसंख्या कोणती ?
1) x +30 2) x+14
3) x+29 4) x +15
3) 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?
1) 171 2) 153
3) 136 4) 152
4) खालीलपैकी कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे?
1) 625 2) 650
3) 325 4) 300
5) 378 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
1) 27 2) 29
3) 28 4) 19
6) 15 व्यासपीठावरील 8 पाहुण्यांनी प्रत्येकाशी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने झाली ?
1) 21 2) 28
3) 16 4) 15
7) टेनिस खेळाच्या स्पर्धेत 10 खेळाडूंनी भाग घेतला होता. जर प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एक सामना खेळला, तर एकूण किती सामने खेळले गेले ?
1) 55 2) 45
3) 36 4) 20
8) बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येकांशी एक सामना खेळला तेव्हा एकूण 32 सामने खेळले गेले, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता ?
1) 7 2) 6
3) 14 4) 9
9) 125 पानांच्या एका गणिताच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास; एकूण किती खिळे जुळवावे लागतील?
1) 125 2) 250
3) 264 4) 267
10) एका पुस्तकाची 250 पाने आहेत, तर त्या पानांवर क्रमांक घालण्यास; 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल?
1) 106 2) 55
3) 90 4) 105
11) 9 पेन्सिलींना 13.50 रु. पडतात; तर 54 रुपयांत किती डझन पेन्सिली येतील ?
1) 4 2) 4.5
3) 3 4) 3.5
12) एकाच प्रकारच्या अर्धा डझन पेनांची किंमत 75 रु. आहे; तर अशा 16 पेनांची एकूण किंमत किती ?
1) 200 रु 2) 187.50 .
3) 225 रु. 4) 212.50 रु.
13) 3 कामगारांची एका आठवड्याची मजूरी 840 रु. आहे; तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती?
1) 175 रु. 2) 200 रु
3) 150रु. 4) 120 रु.
14) 1800 पेरु 15 पेट्यांत समान भरले. त्यापैकी 10 पेटया मुंबईला विक्रीसाठी पाठविल्या, तर किती पेरु मुंबईला पाठविले?
1) 150 2) 900
3) 120 4) 1200
15) 9 लीटर दूध 45 मुलांना सारखे वाटले, तर प्रत्येक मुलाला किती दूध मिळेल?
1) 200ml 2) 2000 मिली
3) 20 ml 4) 2ml
16) 14 मजूरांची आठवड्याची मजूरी 7056 रूपये असल्यास, 10 मजूरांची एका दिवसाची मजूरी किती ?
1) 5040 2) 720
3) 270 4) 504
17) एका माळेत 18 मणी याप्रमाणे 32 माळा आहेत, त्या सर्व माळांतील मणी एकत्र करुन प्रत्येक माळेत 8 मणी याप्रमाणे माळा केल्यास किती माळा होतील?
1) 52 2) 82
3) 62 4) 72
18) 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले; तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर ?
1) 82 2) 65
3) 55 4) 56
19) 360 मीटर तार 4 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
1) 72 मीटर 2) 60 मीटर
90 मीटर 4) 27 मीटर
20) 300 फुलांपैकी प्रत्येकी 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या. उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावी लागतील ?
1) 8 फुले. 2) 10 फुले
3) 12 फुले 4) 15 फुले
21) रमेश 12 सेकंदांत 15 मी चालतो; तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती?
1) 5.5 कि.मी 2) 6 कि.मी
3) 4 कि.मी 4) 4.5 कि.मी
22) एका चरख्यावर सहा सेकंदांत 1.5 मीटर सूत कातले जाते; तर अर्ध्या तासात किती मीटर सूत कातले जाईल ?
1) 300M 2) 420M
3) 450M 4) 360M
23) पाव मिनिटात एक टिकली याप्रमाणे पाऊण तासात किती डझन टिकल्या तयार करता येतील?
1) 15 2) 18
3) 12 4) 16
24) 15 मीटर अंतरावर एक याप्रमाणे समान अंतरावर खांब रोवले आहेत. पहिल्या खांबापासून सुरुवात करुन तेजस 6 खांब 15 सेकंदांत ओलांडतो, तर तो दीड मिनिटांत किती खांब ओलांडेल?
1) 30 2) 31
3) 28 4) 29
25) 6 सेकंदांत एक पिशवी याप्रमाणे 1 तास 40 मिनिटांत एकूण किती पिशव्या भरल्या जातील?
1) 1400 2) 1000
3) 1200 4)900