मराठी-व्याकरण-भाषेचे-अक्षर-स्वर-वर्णमाला-मुळाक्षरे-घटक
1) वर्ण : तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात; म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. ती ध्वनींची प्रतिके असतात. एखाद्या भाषेत जेवढे ध्वनी असतात तेवढेच वर्णही असतात. ध्वनी हे जीवंत, प्रवाही व परिवर्तनशील असतात, तर वर्ण हे स्थिर, काही प्रमाणात कृत्रिम व बद्ध स्वरूपात असतात. प्रत्येक ध्वनीला स्वतःचे व्यक्तीत्व/वेगळेपणा असतो. ध्वनींचे उच्चारण व प्रत्यक्ष लेखन यात बऱ्याचदा फरक पडू शकतो. जसे - जहाज, जग. वर्णाचे विभाजन होत नाही. जसे - अ, त्, काही वर्ण दोन घटकांचे एकत्रीकरण असते, जसे- क्ष, ए त्यांना संयुक्त वर्ण असे म्हणतात. वर्णमाला लिहिताना स्वरांचा पाय मोडला जात नाही कारण ते पूर्ण उच्चारित असतात, मात्र व्यंजनांचा पाय मोडला जातो.
2) अक्षर : आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. बोलणे नष्ट होते; परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते; म्हणून या सांकेतिक खुणांना 'अक्षर' (नष्ट न होणारे) असे म्हणतात. अक्षर हे पूर्ण उच्चारित असावे लागते. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांचा अक्षरात समावेश होतो. अक्षरात एक किंवा अधिक ध्वनी असू शकतात. अक्षराचा पाय मोडला जात नाही. अक्षरमाला लिहिताना अक्षराचा पाय मोडू नये.
3) स्वर : स्वर हे वर्ण तसेच अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडतात. त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णांची गरज नसते.
4) व्यंजन: व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ते वर्ण असतात तर पाय न मोडता लिहिल्यास अक्षरे असतात. :
5) शब्द: ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्यास 'शब्द' असे म्हणतात. शब्दाला जे लिंग,विभक्ती, वचन, आख्यात व पुरुष यानुसार जे प्रत्यय लागतात, त्यांना चरम प्रत्यय असे म्हणतात. शब्द हा स्वतंत्र अस्तित्व व अर्थ
असणारा घटक आहे.
शब्दाचा वापर वाक्यात केल्यास त्याला पद असे म्हणतात. शब्दाच्या मूळरूपाला प्रकृती
तर प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या रूपास विकृती असे म्हणतात. डॉ. लीला गोविलकर
यांच्या मते, वाक्यात वापरलेला प्रत्येक शब्द हा पदच असतो.
शब्दाची लक्षणे :
1) शब्द एक ध्वनी
किंवा ध्वनीसमूह असतो.
2) शब्दाला
संकेताने किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त होणे गरजेचे
3) त्याचा
स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे.
उदा. तंगप-पतंग
6) वाक्य : 'पूर्ण
अर्थाचे बोलणे' किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्याच्या
रचनेत शब्द विशिष्ट क्रमाने मांडले जातात, त्यामुळे वाक्याला काही अर्थ प्राप्त
होतो. जर शब्दांचा क्रम बदलला तर वाक्याचा अर्थसुद्धा बदलू शकतो. शब्दांचा अभ्यास
‘कोशशास्त्रात’ केला जातो. व्याकरणामध्ये मात्र शब्दांच्या बदलणाऱ्या रूपांचा,
प्रत्ययांचा प्रामुख्याने विचार केला जातो. यालाच ‘रूपविमर्शशास्त्र'
म्हणतात. इंग्रजी Analysis
या शब्दावरून मराठीत वाक्यशास्त्र विचार ही संकल्पना आली आहे.
7) व्याकरण: भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात आले आहेत. यावरून ‘भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण' असे म्हणतात. आयोगाने घेतलेल्या परीक्षेत व्याकरणाची व्याख्या 'भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र' अशी दिली आहे. बऱ्याच वर्ग-3 च्या परीक्षेत 'भाषा शुद्ध करणारे शास्त्र' अशी सुद्धा व्याकरणाची व्याख्या दिली आहे. व्याकरणाला 'शब्दशास्त्र' असे सुद्धा म्हटले जाते. कोणतीही भाषा जेव्हा जन्माला येते तेव्हाच तिच्याबरोबर तिचे व्याकरणसुद्धा आकार घेत असते. भाषेचे लेखीरूप हे भाषेचे त्याकाळातील व प्रदेशातील दळणवळण / संवादाचे साधन असते. भाषेच्या लेखीरूपापेक्षा ध्वनी रूप हे चंचल असते. प्रदेश, व्यक्ती, जात, प्रसंग यानुसार त्यात बदल झालेले दिसतात. मराठी व्याकरणाचा विचार इंग्रजी व संस्कृत या भाषांच्या व्याकरणाधारे सुरू झाला. व्याकरणातून वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध सांगितला जातो.
*वर्णमाला / मुळाक्षरे* मूळ वर्णमाला 48 वर्णाची होती. त्यामध्ये 6 नोव्हेंबर 2009 च्या शासन निर्णयानुसार ॲ, ऑ या इंग्रजी स्वरांचा तसेच क्षू, ज्ञ् या संयुक्त व्यंजनांचा वर्णमालेत समावेश होतो, असे स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे वर्णांची संख्या 52 होते. याविषयी अनेक संभ्रम होते. कारण वर्णमालेतील वर्णांची संख्या 50 मानावी की 52 याविषयी मत-मतांतरे होती. त्यामुळे माहितीच्या अधिकारात याविषयी पाठपुरावा केला असता पुढील तीन संस्थांनी (राज्य मराठी विकास संस्था, पुणे विदयापीठ, भाषा संचालनालय) वर्णमालेतील वर्णांची संख्या 52 आहे, असेच नमुद केलेले आहे. या अनुषंगाने पुस्तकात काही बदल करत आहे, याची विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी. याशिवाय 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने व 2 संयुक्त व्यंजनांचा वेगळा गट असे 4 गट मानावेत असे सांगितलेले आहे. इंग्रजी स्वरांना ऱ्हस्व किंवा दीर्घ अशा कोणत्याही गटात टाकलेले नाही, असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. त्यांचे वर्णमालेतील स्थान हे त्यांच्या उच्चारावरून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ए नंतर ॲ असल्याने अॅ चा उच्चार कंठतालव्य व ओ नंतर ऑ असल्याने ऑ चा उच्चार कंठौष्ठ्य मानला आहे. क्ष्, ज्ञ् यांचा पाय मोडल्यास संयुक्त व्यंजने, तर पाय न मोडल्यास जोडाक्षरे मानावीत. क्षु, ज्ञ् यांचा समावेश वर्णमालेत करावा, असा विचार म. बा. सबनीस यांनी मांडला होता, तर अॅ, ऑ या इंग्रजी स्वरांचा समावेश वर्णमालेत करावा, असे मत प्रा. अरविंद मंगरुळकर यांनी व्यक्त केले होते. सदर बदल हे पुराव्यानिशी विदयार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी करत आहे
वेळोवेळी शासनाकडून जी माहिती प्राप्त होईल, ती आपणापर्यंत पोहोचविली जाईल.
य्, र्, लू, व्,
ळ्,
क्षू, ज्ञ्
*वर्णमालेविषयी महत्त्वाचे
1) मूळ वर्णमालेतील वर्णांची संख्या 48 होती तर आधुनिक वर्णमालेत ती 52 आहे.
2) ऋ, ऌ या स्वरांचा चौदाखडीत समावेश होत नाही.
3) 'ऌ, ञ्, ऋ हे वर्ण भविष्यात नष्ट होण्याची शक्यता आहे.
4) 'ॲ, ऑ' यांचा पाठ्यपुस्तकात स्वर असा उल्लेख आहे; म्हणून उत्तरसुद्धा स्वर असेच द्यावे.
5) ‘र्' या वर्णाचा उच्चार करताना कंपन होते; म्हणून त्याला 'कंपित वर्ण' म्हणतात.
6) शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल तर त्याला व्यंजनान्त म्हणतात, जर पाय मोडलेला नसेल तर त्याला स्वरांन्त म्हणतात.
7) शेवटी स्वतंत्र उभा दंड असलेले वर्ण - शू, ण्, ग्---
8) मध्ये उभा दंड - क्, फ्
■ वर्णमाला व वर्णांचे प्रकार
A)स्वरः- 14
1) -हस्व स्वर :- अ, इ, उ, ऋ, ऌ,(5)
2) दीर्घ स्वरः- आ, ई, ऊ, (3)
3) संयुक्त स्वरः- ए, ऐ, ओ, औ, (4)
4) इंग्रजी स्वरः- ॲ, ऑ,
5) स्वराधीः- अं, अ:
6) कठोर वर्णः- क्, खू,
च्, छ्,
ट्, ठ्,
त्, थ्,
प्, फ्
7) मृदु वर्णः- गू, घ
ज्, झ,
ड्, ढ्,
द्, ध्,
प्, फ्
8) अनुनासिक/ परवर्ण
ङ्, ञ, ण्, नू, म
9) अर्धस्वरः- य्, र्, लू, व्,
10) उष्मे/ घर्षकः- शू, ष, सू,
11) महाप्राणः- ह
12) द्रविडीयनः- ळ ( स्वतंत्र वर्ण)
13) संयुक्त व्यंजनेः- क्षू, ज्ञ्
*वर्णांचे वर्गीकरण
A स्वर : ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना स्वर असे म्हणतात. स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडविलेला नसतो. स्वरांचा उच्चार प्रवाही असतो त्यामुळे तो लांबविता येतो, व्यंजनांचा उच्चार मात्र प्रवाही नसतो. स्वर मुळातच अक्षर असतो व तो व्यंजनांच्या शेवटी मिसळून व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त करून देण्याचे कार्य करतो. स्वरांना अच् असे म्हणतात. स्वरांचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात :
आ) दीर्घ स्वर : ‘आ, ई, ऊ’ या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणजेच लांबट उच्चार होतो; म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात.
क) संयुक्त स्वर : ‘ए, ऐ, ओ, औ' हे स्वर इतर दोन स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर
म्हणतात. संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात.
उदा: 1) ए = अ + इ / ई
2) ऐ = आ + इ / ई
3) ओ = अ + उ / ऊ
4) औ = आ + उ / ऊ
*इंग्रजी स्वर: ॲ, ऑ हे इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर आहेत.
याशिवाय स्वरांचे सजातीय स्वर व विजातीय स्वर असे उच्चार स्थानांवरून दोन प्रकार पडतात.
1) सजातीय स्वर : तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ
पुन्हा आल्यास सजातीय स्वरांची जोडी तयार होते. संयुक्त स्वरांचा सजातीय
स्वरांमध्ये समावेश होत नाही. एकाच उच्चार स्थानांतून निघणाऱ्या स्वरांना सजातीय
स्वर असे म्हणतात.
उदा: 1) अ - आ
2) इ ई
3) उ ऊ
टीप : पूर्वी ॠ-ऋ, ऌ-लृ यांचासुद्धा सजातीय स्वरांमध्ये समावेश केला जात होता; परंतु आता यातील दीर्घ स्वर जवळजवळ वापरात नाहीत.
2) विजातीय स्वर : तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा न येता दुसराच स्वर आल्यास विजातीय स्वरांची जोडी तयार होते. भिन्न उच्चार स्थानांतून निघणाऱ्या स्वरांना 'विजातीय स्वर' असे म्हणतात. ए, ऐ, ओ, औ या संयुक्त स्वरात सजातीयत्व नाही कारण ते मुळातच विजातीय स्वरोत्पन्न आहेत. उदा: 1) अ – इ
2) अ - उ
3) उ - ई
4) इ - ऊ
*सजातीय व विजातीय स्वरांविषयी महत्त्वाचे :
1) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो.
2) दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो.
3) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत.
3) मात्रा :
* हस्व व दीर्घ स्वरांचा उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीवरून त्यांच्या मात्रा
ठरतात.
* हस्व स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची एक मात्रा असते.
* दीर्घ स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीच्या दोन मात्रा असतात.
2) स्वरादी : 'अं व अः' अनुस्वार व विसर्ग या दोन
वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावाच लागतो; म्हणून
ज्याच्या आधी स्वर आहे, त्याला स्वरादी असे म्हणतात.
अ) अनुस्वार (अं) :एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो व मग अनुस्वाराचा उच्चार होतो; म्हणून अनुस्वाराला लगेच मागून आलेला उच्चार किंवा दुसऱ्यावर स्वार होणारा असेसुद्धा म्हणतात. 'अं' चे अनुस्वार व अनुनासिक असे दोन उच्चार होतात. स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात जसे गंगा, घंटा, शंकर तर ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला अनुनासिक म्हणतात.
आ) विसर्ग (अ:) :
* विसर्ग म्हणजे मुक्त होणे होय. 'अः' चा उच्चार करताना हवेचा विसर्ग होतो;
म्हणून या वर्णाला विसर्ग म्हणतात.
* विसर्गाचा उच्चार ‘ह्' या वर्णाला थोडा झटका दिल्याप्रमाणे होतो. विसर्गाचा
उच्चार करण्यापूर्वीसुद्धा एखाद्या स्वराचा आधार घ्यावाच लागतो.
* 'दुःख' या शब्दात विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी 'उ' या स्वराचा आधार घ्यावा
लागला आहे.
1) वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत.
2) उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श तसेच हवेचा मार्ग अडवून शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागणाऱ्या प्रत्येक वर्णाचा व्यंजनात समावेश होतो.
3) व्यंजनांचा उच्चार पूर्ण/स्पष्ट करण्यासाठी शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे
लागते; म्हणून त्यांना स्वरान्त असेसुद्धा म्हणतात. 4) व्यंजने ही अपूर्ण
उच्चारांची असल्याने त्यांचा पाय मोडून लिहितात. त्यात स्वर मिळवल्यास मात्र ती
पाय मोडून लिहिली जात नाहीत.
5) दैनंदिन वापरात व्यंजनात स्वर मिळवूनच त्यांचा उच्चार करावा लागतो. 6)
उच्चार पूर्ण होण्यासाठी व्यंजने स्वरांवर अवलंबून असतात; म्हणून त्यांना 'परवर्ण'
म्हणतात.
7) व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजनात स्वर मिसळणे गरजेचे असते. 8) आखूड
/ तोकड्या उच्चाराला निभृत उच्चार म्हणतात.
9) संस्कृतमध्ये व्यंजनांना 'हल्' तर स्वरांना 'अच्' असे म्हणतात.
10) व्यंजनात स्वर मिळवला, की अक्षर बनते.
■ चौदाखडी
· प्रत्येक व्यंजनात – ‘अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, अॅ, ऐ, ओ, ऑ, औ,' हे बारा स्वर व
'अं अः' हे दोन स्वरादी अशी चौदा चिन्हे मिळवून चौदा अक्षरे तयार होतात, याला
चौदाखडी असे म्हणतात.
· उदा. क, का, कि, की, कु, कू, के, कॅ, कै, को, कॉ, कौ, कं, क:
1) स्पर्श व्यंजने : स्पर्श व्यंजने एकूण 25 आहेत, त्यांची खालील गटांत विभागणी होते.
(अ) कठोर व्यंजने : ‘क्, ख्, च्, छ्, ट्, ट्, त्, थ्, प्, फ्' यांचा उच्चार करावयास कठीण असल्यामुळे त्यांना कठोर व्यंजने म्हणतात. शू, ष्, स् या वर्णांचाही कठोर वर्णांत समावेश होतो. कठोर व्यंजनांना 'श्वास' किंवा 'अघोष' वर्ण म्हणतात. एकूण कठोर व्यंजने 13 आहेत.
ब) मृदू व्यंजने : ‘ग्, घ्, ज्, झ्, ड्, ढ्, द्, धू, ब्, भ्' या व्यंजनांचा उच्चार करावयास सोपा असल्यामुळे त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. य्, र्, ल्, व्, ह्, ळ् तसेच सर्व स्वर, स्वरादी, अनुनासिके या वर्णांचासुद्धा मृदू वर्णांत समावेश होतो. यांनाच नाद / घोषवर्ण म्हणतात.
2) अर्धस्वर : ‘यू, र, लू, व्' यांची उच्चार स्थाने अनुक्रमे 'इ, ऋ, ऌ, उ' या स्वरांच्या उच्चार स्थानांवरच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे; म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात.
• अर्धस्वर स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्या मध्ये येतात; म्हणून त्यांना अंत:स्थ म्हणतात. र्, ल् यांना द्रववर्ण असे सुद्धा म्हणतात. कारण त्यांच्या उच्चारात नादयुक्त श्वास प्रवाही असतो. अर्धस्वर एकूण चार आहेत.
स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम यू, व्, र्, ल् असा आहे.
3) उष्मे :'शू, ष्, स्' यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णांचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. त्यामुळे त्यांना उष्मे (घर्षक) असे म्हणतात. या वर्णांना सीत्कार असे सुद्धा म्हणतात.
4) महाप्राण :‘ह' वर्णाचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते; म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. ‘ख्, घ्, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्, ध्, फ्, भ्, शू, ष्, स्' या वर्णांत 'ह्' प्रमाणे मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडतो म्हणून त्यांना महाप्राण म्हणतात.
• मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना H अक्षर
वापरावे लागते, त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात. बाकीचे अल्पप्राण आहेत.
उदा. ख- KH (महाप्राण), ग - G
(अल्पप्राण) एकूण महाप्राण 14 आहेत.
अपवाद - स् (S) महाप्राण, च् (Ch) अल्पप्राण
5) अल्पप्राण : ‘क्, ग्, ङ्, च्, ज्, ञ्, ट्, ड्, ण्,
त्, द्, न्, प्, ब्, म्, य्, र्, ल्, व्, ळ्' या व्यंजनांना अल्पप्राण असे
म्हणतात. या वर्णांत 'ह्' ची छटा नसते.
5) द्रविडीयन वर्ण :
‘ळ्’ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जात होता; परंतु आयोगाने कर सहायक परीक्षेत याचे उत्तर द्रविडीयन भाषा गटाकडून घेतलेला वर्ण असे दिले आहे; म्हणून यापुढे असेच उत्तर द्यावे
. 6) संयुक्त व्यंजनेः- क्षू, ज्ञ् या संयुक्त व्यंजनांचाही आता
वर्णमालेत समावेश होतो.