![]() |
विशेषणविचार-विशेष्य-उपमेय-विशेषण |
● विशेषणविचार-विशेष्य-उपमेय
Ø उंच झाड हिरवे आहे.
Ø काळे मेघ दाटले आहेत
Ø गारा वारा सुटला आहे.
Ø लहान मुले खेळत आहेत.
Ø मोठी माणसे कामात आहेत.
Ø लाल वासरे बागडत आहेत.
*विशेषण हे नामाच्या आगोदर येते व नंतरच्या त्या नामाविषयी विशेष माहिती देऊन जाते.
Ø हिरवा माळ
Ø चार केळी
Ø
धावती गाडी
*- किती व कशी माहिती मिळते म्हणुन त्यात विशेषण आसे
म्हणतात.
व्याख्या- जो शब्द नामाबद्दल विशेष महिती सांगुन नामाची व्यापी मर्यादित करतो. तो विकारी शब्द म्हणजे विशेषण होय"
*विशषेँण ज्या पदार्था बद्दल ( नामा बद्दल) कांही तरी विशेष सांगते त्या नामाला विशेष्य आसे म्हणतात
·
नामाप्रमाणे, विशेषानाला लिंग, वचन, विभवनीचे विकार होत आसतात
·
विशेषण हे नेहमी नामासोबत येते
· वाक्यात नाम नसेल तर विशेषण येत नाही.
· नामाला विशेषणात विशेष्य (उपमेय) आसे
म्हणतात
● विशेषणाविचार-विशेषणांचे प्रकार
A)
अधिविशेषण
*नामाच्या (विशेष्य) आगोदर येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण आसे म्हणतात.
*हा गोड आंबा आहे.
B)
विधिविशेषण.
*नामाच्या (विशेष्य) नंतर येणाया विशेषणाला विधिविशेषण' म्हणतात,
*हा आंबा गोड आहे.
*विधोषणाचे
दोन प्रकार पडतात.
A) सिद्धविशेषण
1, गुणविशेषण -
2. संख्याविशेषण
अ) गणनावाचक
आ) क्रमवाचक
इ) आवृतीवाचक
ई) पृथकत्ववाचक.
उ) अनिश्चितवाचक
3. सार्वनामिक विशेषण,
B) साधित विशेषण,
1)
नामसाधित विशेषण
2)
धातुसाधित विशेषण
3)
अव्ययसाधित विशेषण
4)
संबंधी विशेषण
5)
समासघटीत
विशेषण
6) अनिश्चितवाचक,
**************************************
1)*गुणविशेषण*
गुणविशेषण हा
विशेषणाचा पहिला व सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे ज्या विशेषणामुळे नामाच्या ठिकाणचा कोणताही विशेष वा गुण कळून येतो. याला गुणविशेषण आसे म्हणत
उदा: उंच माड
o मोठी मुले.
o हिरवी पाने
o शुभ्र ससा
o सुंदर मुल
o कुरूप पोर
o आंबट चिंचा
o शूर सरदार
o आनंदी माणूस
o रेखीव चित्र
o पिवळे फुल
o निवळासावळा समुद्र
o मधुर आवाज
o कडू कारले
o गरीब सुदामा
१)
गार हवा सुटली आहे.
२)
या बागेत आबेट द्राक्षे आहेत.
३)
हुशार मुले शहाणी असतात.
*************************************
2) संख्या विशेषणः-
एकपरी संख्या विशेषण हेही गुणविशेषणच आहे, ते कारण ते त्या त्या नामासंबंधी विशेष गुण दाखविते.
या विशेषणामुळे प्रामुख्याने संख्याच दाखविण्यात येत असल्याने त्याला संख्याविशेषण आसे स्वतंत्र नाव मिळाले
*उदा:
Ø दहा तोंडांचा रावण –
Ø पहिलावर्ग
Ø दश मुखी राव,
Ø -विसावे शतक,
Ø दशपट मुख,
Ø पावणेपाच इ.
Ø दोन मुली
Ø दोघे भाऊ
Ø तिघी बहीणी.
वरील संख्या विशेषानात फरक जाणवत आसल्यामुळे संख्यावाचक विशेषणांचे त्यानुसार काही उपप्रकार पाडलेले,आहेत.
A) गणनावाचक संख्यवाचक,
शुद्ध संख्यावाचक विशेषण आसे
म्हणतात. कारण त्यांच्या रुपात फरक पडत नाही.
जेंव्हा संख्याची गणना केली जातेसतेंव्हा त्यास
गननावचक विशेषणा आसे म्हणतात
उदा. बारा मुले
एक वाट
*गननावाचक याचे तीन पोट-भाग होनात
1) पूर्णाकवाचक = एक, दोन, तिन, 1, 2, 3,
उदा. चार मुले,
आठ केळी.
दहा डोके,
शंभर कौरव,
2) अपूर्णाकवाचक - पाव, अर्धा, पाऊन, 1/4 1/2 3/4
पाव किलो,
अर्धारस्ता,
पाऊणतास,
सव्वा बारा वाजता,
3) साकल्यवाचक :- (म्हणजे पूर्णाशाने)
दोघे, उभयता, चारही, पाची-पाच
पतिपत्नी, चार युगे
तुम्ही पाचंही
चारही साधु चारही दिशांना गेलो.
तुम्ही उभयता जेवाला या.
4) क्रमवाचक विशेषण - / संख्यापुरक विशेषण असे की म्हणतात.
संख्येचे फरक (पूर्णत्व) करणारा जो अर्थ तो तो त्याचा वाचक शब्द आसतो.
जेव्हा संख्येचा क्रम सांगितला जातो तेंव्हा त्याला क्रमवाचक विशेषण, असे म्हणतात
उदा.
o पहिला
पांडव (कर्ण)
o तिसरा डोळा (शंकराचा)
o आठवा पुत्र
(कृष्ण)
o तेरावा दिवस ( शुद्ध श्राध्द )
o चौथा वर्ग,
o दहावे वर्ष
o सातवे घर
प्रथमा द्वितीय, तृतिय चतुर्थी पंचमी सप्तमी, ही.
B) आवृतिवाचकसंख्या विशेषण
।। संख्यावृती वाचक
संख्या व आवृती हे दोन शब्द मिळून हा
सामासिक शब्द झाला आहे. याला केवळ आवृतिवाचक आसे ही म्हणतात
संख्यांची आव़ृती
(वारंवार येणे) दाखविण्यात येते, म्हणून याल आवृतिवाचक विशेषण म्हणतात
उदा:-
Ø किती पट,
Ø दुप्पट की तिप्पट
Ø दुहेरी,
Ø तिप्पट,
Ø चौपदरी,
Ø शतपट
Ø त्रिगुणीत,
Ø द्विगुणित
Ø शतगुणित,
-दुधान साखर घातली कि तिची गोडी द्विगुणित होते
वेडपट राजाचा बावळट प्रधान शतपट (शतगुणित) मुर्ख असतो,
त्रिवारा मुजरा
नऊवारी साडी,
*ती दिसली कि आनंद द्विगुणित होतो
C) पृथकत्ववाचक विशेषण
ज्या संख्येचा वेगवेगळा बोध करून दिला जातो त्याल पृथकत्ववाचक विशेषण' म्हणतात
Ø एकेक ओळ,
Ø तीन-तीन मुले
Ø दोन-दोन गट
D) अनिश्चितवाचक विशेषण
नेमक्या संख्येचा बोध होत नसतो त्यास अनिश्चितवाचक विशेषण म्हणतात.
Ø उदाः-
§ बरीच घरे
§ पुष्कळ म्हणसे.
§ -सर्वमुले
§ -इतर लोक,
§ -थोडे पक्षी.
§ -सर्व रस्ते
§ -अन्य पाहुणे
*सर्व, काही, अन्य इतर, इत्यादी, एकंदर, अल्प, थोडेसे
*******************************************
3) सर्वनामात्मक विशेषण
एखाधा नामाच्या मागे जेंव्हा त्याचे गुणवर्धन करण्यासाठी एखादे सर्वनाम येते. तेव्हा त्यांचे कार्य विशेषणासारखेच आसते म्हणून त्याला सर्वनामात्मक विशेषण म्हणतात
· ती मांजर,
· हा मुलगा
· जो कुत्रा,
· तो पतंग
· मला गरिबाला
· तुम्ही पोरे
सार्वनामिक विशेष आसे म्हणतात. मुळात ते सर्वनामे आसतात पण त्याचा वापर विशेषणासारखा होतो.
उदा: मी,तु, तो.हा,ही. हे, तो,ती, ते, तुम्ही,आम्ही ते, परंतु या सर्व नामापासुन काही विशिष्ट सार्वनाम तयार होतात.
o *मी - माझा, आम्ही -आमचा
o तु-तुझा, तुम्ही-तुमचा,
o हा- असा, असला, इतका, एवढा, अमका
o तो- त्याचा. (एकवचन)
o ते - त्यांच्या से व असा, असला, इतका, एवढा, अमका
o तो : तसा, तसला तितका, तेवढा, तमका
o जो : जसा, जसला, जितका, जेवदा
o
कोण : कोणता कोणाचा
v काया - कसला, केवढ
भलता, फलाना, कोणी एक, सर्व इत्यादी
* नाम व सर्वनाम यतील भेद
1) नाम स्व सर्वाधिने स्वतंत्र आसते ..
उदाः- राम आभ्यास करतो.
*) सर्वनाम नामाच्या मागे आले किंवा नामाच्या ऐवजी आले तरच त्याला अर्थ प्राप्त होतो.
उदाः- - तो मुलगा प्रज्ञावंत आहे.
तो प्रज्ञावंत आहे. एवढे म्हटले तर कोण ? आसा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर मुलगा आसे द्यावे लागते.
उदाः- कृष्ण देवकीचा पुत्र | तो यशोदेलाच माता समजे,
येथे- तो यशोदेलाच माता समजे ! म्हटले तर तो कोण? असा प्रश्न उपस्थित होतो.
तेंव्हा कृष्ण आले उत्तर द्यावे लागते. नामा ऐवजी जेंव्हा ते येते तेंव्हा
ते सर्वनाम होते,नामामागे जेंव्हा ते येते तेव्हा ते विशेषण बनते
. 1- रामाने रावणाला मारले, तरी तो त्याला शत्रु मानत नसे.
. 2 - तोच राम श्री सीते साठी लंकेला गेले
2) सर्वनाम विशेषण यांतील भेद
- विशेषण
स्वतःचा विशिष्ट अर्थ आसतो. - तसा तो सर्वनामाला नसतो. त्या
नामापुरता आर्थ त्या सर्वनामाला चिटकतो.
उदाः- तो घोडा,
तो पोरगा.... येथे घोड्याचा अर्थ तो या सर्वनामाला
तात्पुरता चिकला आहे.
उदाः- तो मागिल घोडा, आणि मुलगा काडून टाकल्यावर तो कोण? आसा प्रश्न निर्माण होतो.
*> विशेषणाचे तसे नाही. विशेषणाला स्वतःचा जो
कांही विशिष्ट अर्थ आसेल त्याच प्रमाणे नामाच्या गुणधर्मात बदल पडतो.
o उदाः- चपळ मुलगा
§ मंद मुलगा
- येथे मुलगा या नामाला दोन वेगवेगळे विशेषण
लागले आहेत. त्यानुसार चपळ मुलगा- म्हणजे जलद गतिने चालनारा मुलाचा गुण कळतो तर मंद मुलगा म्हणजे गतिहीन मुलगा असा पहिल्याच्या नेमका विरुद्ध अर्थ त्या नामाला चिटला आहे या विशेषणाला स्वत:चा विशिष्ट अर्थ आसतो
*********************************************
-: नाम आणि विशेषण यांतील भेद :
नामाचा उपयोग स्वतंत्ररीत्या होतो. तसा विशेषणाचा होत नाही- परंतु ते नाम झाले तर मात्र होतो किंवा त्याचा स्वतंत्र उपयोग केला ते नाम बनते
o उदा: पोरगा उंच आहे.
§ देव थोर आहे.
§ चार शिपायानी पकडापकड केली,
§ पहिला घास घेतला.
§ पाशी पडली
या वक्यात अनुक्रमे उंच, चोर, चार, पहिला, हि विशेषणे आहेत. त्यामुळे अनुक्रमे पोरगा, देव, शिपायी व घास. या नामावर आवलन आहेत
-
परंतु तेच काम झाले तर मात्र त्याचा वापर स्वतंत्र रित्या होऊ शकतो.
o
उदा:- राजा उंचावर बसतो. (उंच जागेवर)
§ थोरांचे सर्वच थोर (महत्वाचे)
§ चारानी तिरडी उचलली.
§ पहिल्यांदा ते पाहू
या सर्वच वाक्यातील पूर्वीची विशेषण नामे बनली आहेत. - ती उंचावर, थोराचे,चारांनी, पहिल्यांदा त्यामुळे ती स्वंतत्र
बनली आहेत.
*******************************************
B. नामसाधित विशेषणे :
ही
विशेषणे मुळची नामेच आसतात परंतु ती एखाद्या नामाच्या मागे जेंव्हा येतात तेव्हा त्यांचा उपयोग विशेषणासारखा होतो. म्हणून त्याना नामसाधित विशेषणे आसे
म्हणतात कधी-कधी ही नामे विशेषणा सारखे रूप ही धारण करतात
उदा: - *आमच्या गावी ग्रंथदिंडी आली होती.
* फळभाजीपेक्षा पालेभाजी आरोग्यदृष्ट्या उत्तम आसते.
नामांच्या मागे येऊन त्यांची.गुणवृद्धी केली आहे,म्हणूनच विशेषणे बनली आहेत. - ती नामापासुन
बनली आहेत म्हणून त्यांना नामसाधित विशेषण असे म्हटले आहे.
o उदा. नागपुरीसंत्री
§ बनारशीशालु
§ सातारीपेठे.
§ औरंगाबादीमश्रु
§ बिदरी धातुकाम
§ पुणेरी पगडी,
§ सोलापुरी चादरी
§ चंदेरी साडी,
मुळ नावाच्या रुपात पालट होवून त्याची विशेषण बनली आहेत
**************************************
2) सर्वनामसाधित विशेषण -
: सर्वनाम साधित विशेषणे ही सर्वनाम पासुन बनलेली आसतात
- पाठीमागे आले ते पहा समजेल
**************************************
3) धातुसाधित विशेषणे :
नाम- सर्वनामांप्रमाणे मुळ धातुपासुन विशेषणे तयार होतात
धातु म्हणजे एखाद्या शब्दाचे मुळ रुप
o उदा. कृ, - करणे.
§ गम- जाणे
§ गै - गाणे,
§ चाल - हलणे इ.
या धातूंपासून शब्द बननात,आणि त्या शब्दांपासून जेंव्हा
विशेषण तयार होते. तेव्हा त्याला "धातुसाधित विशेषण" आसे म्हणतात.
§ उदा:- करणारा माणुस न बोलताच काम करीत आसतो.(कृ-शब्दाचे मुळ रुप )
· जाणारा काळ पुढेच जात राहतो.(गम्- शब्दाचे मुळ रुप )
· गाणारा माणूस गातच राहतो.(गै-
शब्दाचे मुळ रुप )
·
हालणारे झाड किती सुंदर दिसते.( चल-
शब्दाचे मुळ रुप )
*त्या- त्या नामाच्या मागे आल्यमुळे विशेषणे झाली आहेत.
Ø (पिक) पिकलेला आंबा,
Ø (रांग) रांगणारे मूल
Ø (वहा) वाहती नदी
Ø (हस) हसरी मुलगी
Ø (बोल) बोलकी बाहुली,
Ø (पेट) पेटती ज्योत
Ø (चाल ) चालणारा हात्ती
Ø (पळ) पळणारी गाडी
Ø (हस ) हसणारी मुले
Ø
(बस ) बसणारे विध्यार्थी
**************************************
4..अव्यवसाधित विशेषणे
अव्ययाचा वापर नामामागे येऊन जेंव्हा विशेषणासारखा होतो तेव्हा अव्यवसाधित विशेषणे म्हणतात
n वर.खाली, पुढे, मागे...ही मुळ अव्यये आसून त्यांना निरनिराळे प्रत्यय लागून शब्द तयार होतात–
उदा:- वरचा
खालची
पुढील
मागुन
वापर जेंव्हा
विशेषणासारखा होतो. तेव्हा ती अब्यवसाधित विशेषणे तयार होतात.
o उदा:- वरचा मजला रिकामा.
§ खालची बाजु विणलेली.
§ पुढील वार सोमवार
§ मागून आली
आणि तिखट झाली.
इ.
§ मागील दार
§ पुढची गल्ली
§ मधली कांदी
§ समोरची मुलगी
अव्ययाना, चा,ब.ई.ल. हो प्रत्यय लावून विशेषणे झालेली आहेत.
**************************************
5)संबंधी विशेषण
-षष्ठी विभक्तीचे प्रत्यय लागून तयार होणारे शब्द त्यांना संबंधी विशेषणा म्हणतात.
· उदाः- राणाचीसाडी.
o उडदाचे पापड
o वडाचे झाड
o उदराची शेपटी इ.
**************************************
6)समासघटीत विशेषण)
जसे सामासिक शब्द विशेषणाचे कार्य करतात त्यास समासघटीत
विशेषण म्हणतात.
उदा: क्रांतिकारी / क्रांतीकारक संभाजी
लंबोदर -गणेश.
एकवचनी – राम
सत्यवादी - हरिश्चंह
वक्रतुंड- गणेश