शब्दांच्या जाती. (एकूण ८ ) विकारी (अव्यय)-4
*नाम ---
* गोविंद, तुकाराम, रोली, रोहीणी, नदी,
* सर्वनाम----
* सर्वनाम : मी,तु. ती, ते, हा, की कोण, काय, आपण
*विशेषण----
* विशेषणः- सुंदर, पाच, मोठा, लहान, गोड कडू
*क्रियापद----
* क्रियापद:- वाचतो, पळतो, खेळला, जाईल, इ
·
अविकारी (अव्यय)-4
*क्रियाविशेषण
* क्रियाविशेषण -पूर्वी, सदा,हळूहळू,येथे,टपटप, खचित,खरोबर इ.
*शब्द योगी---
*शब्दयोगी --घरापुढे ढगामागे,तिच्यासाठी
*उभयान्वयी—
*उभयान्वयी अव्यय आणि, व, परंतु. किंवा. इ.
*केवलप्रयोगी.—
*केवलप्रयोगी अव्ययः अरेरे! शाब्बास, आरे बापरे! चुप, हाय
★ नाम : प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पीत वस्तु किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्यानावांना नाम आसे म्हणतात.
* गोविंद, तुकाराम, रोली, रोहीणी, नदी,
*********************************
* नाम..
A)
सामान्य नाम
B) विशेषनाम
C) भाववाचक नाम
D) धातुसाधित नाम
A) सामान्य नाम : एकाच जातीच्या वस्तुना सामान्यतः जी नावे देण्यात येतात, त्यांना सामान्य नाम म्हणतात
उदा. मोरू चेंडू, ताटका, पाणी, बर्फी, कोल्हा,वृक्ष,किर्ती, गाडी, वैध, वणवा, समुद्र, धैर्य, सैन्य,
* सामान्यनाम हे एकाच जातीच्या पदार्थाना त्यांच्यातील समान गुणधर्मामुळे देण्यात येते.
अ.)समुदायवाचक नाम-- सामान्यनामावरून आनेकरच्या समुदायाला समुदायवाचक नाम म्हणतात.
*सैन्य 'कळप' यावरून अनेक सैनिकांचा बोध होतो तर, कळप या वरुन गुराच समुदायाचा, बोध होता त्याला वर्ग, तुकडी, घडी, परिषद, समिती, इ.
आ.) पदार्थवाचकनाम
विशिष्ट वस्तुचा विशिष्ट गुणधर्म आसतो? अशा वस्तुना अर्थान पदार्थाना मोजता येत नाही. पण त्यांच्यातील गुणसाम्य यांच्या नावातून दिसून येते अश्या सामान्य नामाला पदार्थवाचक नाम म्हणतात उदा :- दुध, तांबे, कापड, सोने
1)
तुमचे वडील कर्णच आहेत...(सामान्यनाम)
2) सिंह हा शुर प्राणी आहे... (सामान्यनाम)
3) माझा मुलगा शांताराम म्हणजे सुदामा होय मुलगा.... (सामान्यनाम)
4) राष्ट्र आमुचा महान..... (सामान्यनाम)
5) खालील पैकी सामान्यनाम असलेल्या शब्द कोणता
A)महाराष्ट्र B) कृष्ण C) सह्याद्री
D) राष्ट्र
6)
खालील सामान्यनाम नसलेला शब्द कोणता.
A)कापड B) ओरड c) माकड D) बोकड
7)खालील पैकी सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.
1)
खुशी 2) नेमी 3) राशी 4) कीर्ती
8) आज आम्हाला शिवाजीची गरज आहे ... (सामान्यनाम)
9) तो काय
बाजीराव आहे..... (सामान्यनाम)
**********************************
*विशेषनाम
विशेषनाम एकाच जातीचे परंतु विशिष्ट वस्तु वा पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे जे नाम विशेषनाम होय
उदा. काशी, गंगा, त्र्यंबकेश्वर, हिमालय,श्रीराम,विठू, भारत, जर्मन, अमेरिका, कमल,इ
1* सामान्याना जातिवाचक, पण विशेषनाम व्यक्तीवाचक
2 * ज्यानामाने संपूर्ण जातीचा बोध होत
नसुन त्या जातीतील, एका विशिष्ट व्यक्तीच बोध होतो त्यास विशेषनाम आसे
म्हणतात.
3* विशेषनाम हे त्या व्यक्तीचे अथवा वस्तुचे स्वतःचे नाव आसते. ते केवळ खुन करिता ठेवले आसते.
1)
भारत माझा देश आहे. ....विशेषनाम
2)पुणे शहर मोठे आहे. ....विशेषनाम
3)
गोविंद झोप . ....विशेषनाम
*सणा,वार, ग्रह यांचा उल्लेख नेहमी. विशेषनामात करावा
★ सामान्यनामाचे अनेकवचन होऊ शकते; पंरतु विशेषनाम, व भाषवाचक नाम यांचे अनेकवचन होत नाही.
सामान्यनाम.. नदी-नध्या, झाड-झाडे, खुर्ची- खुर्ची
*
सामान्यनामाचे विशेषनाम होणे..
केव्हा केव्हा सामान्यनामाचे अर्थावरूनच विशेषनाम होते.
*हिमालय - हिम- म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर - हिमालय
1)
आम्ही कालंच नगरहून आलो...
2)
शेजारची बेबी आता कॉलेजात जाते.
3) आमची राणी mpsc करते
-*विशेषनामाचे सामान्यनाम होणे* –
विशेषनामाचे सामान्यनाम ही होवू शकते.
उदा:-
कर्ण महाभारत कर्ण सुप्रसिद्धच आहे. तो मोठा योध्दा होतो. परंतु औदार्य हा कर्णाचा विशेष गुण होता त्यामुळे आताही एखादा उदार पुरुष दिसल तर, याला आपण कर्ण म्हणतो, यावरून कर्ण या विशेष नामाचे सामान्यीकरण झाल्याने ते सामान्य नाम बनले
· कैकेयीः- ( सावत्रमाता)
· रावण- (दुराचारी माणूस)
· भिम - (
महाकाय – बलवान)
· बृहस्पती --( बुब्दीमान)
· जमदग्नी---( रागीट माणुस)
· बाजीराव-- ( शुर व्यक्ती)
· कुंभकर्ण – (झोपाळू व्यक्ती)
1)
आज आम्हाला शिवाजीची गरज आहे
2)
तो काय बाजीराव आहे.
3)
माझा भाऊ म्हणजे कुंभकर्णच आहे.
*******************************
-** भाववाचक नाम** :-
प्राण्यांचा वा वस्तुचा , धर्म, किंवा स्वभाव दर्शविणारे जे नाम ते भाववाचक नाम होय"
*प्रत्यक्ष व्यक्तीच्या उल्लेखाशिवाय असलेले गुणाचे नाव म्हणजे भाववाचक नाम होय*
(
पाटीलकी, गरिबी, मित्रत्व, जडत्व, सौंदर्य,मोठेपणा, गोडी, नम्रता, गारवा, नावीन्य,थोरपणा, उदारता, हुशारी)
*त्या त्या वस्तुमधिल धर्म दाखविल्या आसल्यामुळे त्याला "धर्मवाचका" नाम ही म्हणतात--भाववाचक नामाला स्वतंत्र्य अस्तित्व नसते. ते त्याला पदार्थाच्या आश्रयानेच राहाते –
*गोडी- साखरेची गोडी.
*औदार्य- कर्णाचे औदर्य,
*चातुर्य-कोल्हाचे चातुर्य,
*भोळेपणा - धर्मराजाचा भोळेपण)
>एखाद्या पदार्थाची स्थिती वा क्रिया ज्या नामामुळे दिसुन येते. त्यालाही भाववाचक नामाच म्हणतात
–
--* मरण, मनन,
वार्धक्य, तारुण्य, प्रौढपणा, ही *स्थितीदर्शक तर -चौर्य, उड्डाण, नृत्य, हास्य, लास्य, गतित्व, ही क्रियादर्शक होत
*राम - रमविणारा, रंजन करणारा
राम - चरित्र,
-*-भाववाचक नाम, हा एकपरी सामान्य नामाचाच प्रकार आसतो. कारण धैर्य म्हटल की जो गुण
जेवढे धैर्यशील लोक आसतील त्या सर्वाना लागु होतो. या प्रमाणे गोडी, श्रीमंती,चांगुलपणा,हरामखोरी, कंदफितुरी,माधुर्य यांचे ही जाणावे
***भाववाचक नाम***
विशेषणाला प्रत्यय लावुन तयार केली जातात – य,त्व, पण, पणा, ई, ता,गिरी, वा, आई, यासारखे प्रत्यय ते साधता येतात,
**भाववाचकनाम**
शब्द प्रत्यय भाववाचक नाम
1.सुंदर - य - सौंदर्य,शौर्य, माधुर्य, गांभीर्य क्रौर्य,
औदार्य, जाड्य, शिथिलय,
2.गोड -वा - गोडवा,ओलवा, गारवा, विसावा
3.मनुष्य -त्व - मनुष्यत्व,देवत्व, शुत्रत्व, मित्रत्व,
प्रौढत्व, वीरत्व, पशुत्व
4.नवल - आई - नवलाई,खोदाई, चपळाई
दांडाई धुलाई
5.श्रीमंत –ई - श्रीमंती,गोडी,गरीबी,
लबाडी,वकिली, हमाली, मैत्री,
6. पाटील -की - आपुलकी, भिक्षुकी,गावकी,
गायकी, बहादुरकी, पाटीलकी
7.शांत -ता- शांतता,शक्यता, समता,
भिन्नता,भिगता, नम्रता, कुरता.
8.
दादा -गिरी- दादागिरी,गुलामगिरी,कसवेगिरी
लुच्चेगिरी,सौदागिरी,मुलुखगिरी,
9.देव -पण/पणा- देवपण,देवपणा,मोठपणा मोठपणा,
प्रामाणिकपण/ प्रमाणिकपणा,थोरपण /
थोरपणा,लहानपण /लहानपणा)
1.नुसती फुशारकी काय कामाची
2.आंगी मोठेपणा आसवा.
3.सर्वांनी शांतता पाळावी.
4.प्रेमाचा ओलावा जिवनात अंकुर खुलविते.
5.शांतारामची लबाडी मुळे मुळे धुलाई झाली.
6. बायकोचा नव-यावर विश्वास हवा
******************************
D*धातुसाधित
नामे
धातुपासून तयार झालेल्या नामाला' धातुसाधित नाम' आसे म्हणतात
1)
देणाराचे हात हजारो !
येथे मुळ धातु 'दे' त्याला 'ण' हा प्रत्यय लागुन 'देणारा' आसे त्यांचे नाम बनाले.
2)
घेणा-याने घेत जावे.
येथे मुळ धातु 'घे' त्याला 'ण' हा प्रत्यय लागुन 'घेणारा' आसे त्यांचे नाम बनाले.
3)
त्याचे वागणे विक्षिप्त आहे.
'वाग' मुळ धातु त्याला 'णे' हा प्रत्यय लागुन वागणे आसे त्यांचे नाम बनाले.
4)
हात्तीचे चालणे मंद आसते.
येथे मुळ धातु 'चाल' त्याला 'णे' हा प्रत्यय लागुन ' चालणे' आसे त्यांचे नाम बनाले.
5)
तिचे हास्य मधुर आहे-
येथे मुळ धातु ' हस' त्याला 'य' हा प्रत्यय लागुन ' हास्य ' आसे त्यांचे नाम बनाले
6)
आता रडणे थांबव
–
येथे मुळ धातु ' रड'
त्याला 'णे' हा प्रत्यय लागुन ' रडणे ' आसे त्यांचे नाम बनाले
7) बोलायाचे काय जाते ? धातु
येथे मुळ धातु 'बोल' त्याला 'णे' हा प्रत्यय लागुन ' बोलायाचे ' आसे त्यांचे नाम बनाले
1*विशेषनाम - एकवचन - एकत्ववर्शक, विभक्ति प्रत्यय लागतात. सामान्य रूप होते.
2*सामाण्यानाम- सर्व प्रकारचे लिग,वचन - विभक्ती यांचे प्रत्यय लागतात सामाण्य रुप होते.
3*भाववाचक-एकवचन, ,पण/पणा, शब्दसधित,प्रत्ययांवर अवलंबुन सामाण्य रूप होते
1)
प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे :-
"भाववाचक."
2)
गुरुजीचे वागणे प्रेमळ असते........ "भाववाचक."
3)
घोड्याचे धावने
जोरात आसते..... "भाववाचक."
4)
चालणे हा व्यायम आहे. .... "भाववाचक."
5)
या वयात तुला असे बोलणे शोभत नाही.."भाववाचक."