सर्वनाम- प्रतिनिधी-'सर्वादीनि-सर्वनामनि'-pronoun.
- सर्वनाम म्हणजे नामाचा प्रतिनिधी म्हणून त्याला प्रतिनाम आसे म्हणतात नामाचा पुनरुच्चार टळण्यासाठी नामाऐवजी सर्वनामाचा वापर करतात सर्वनामाला स्वंतत्र्य अर्थ नसतो, सर्वनाम कोणत्याही नाम बद्दल
येतो.
*व्याख्याः- ज्याला स्वत:चा विशिष्ट अर्थ नसुन जे पूर्वसंबंधाला अनुसरून कोणत्याही नामाचे अर्थवाहक बनते.त्या विकारी शब्दाला सर्वनाम आसे म्हणतात
*सर्वनामाची संधी (९) आहेत,
-मी, तु, तो, हा, कोण, काय, जो. आपण, स्वत:' इ,
→ बोलणारा स्वत:बद्दल मी
व स्वत: असे म्हणतो.
-> दुस-याबद्दल
तू व आपण म्हणतो.
-> ज्यांच्याविषयी बोलायचे तो जवळ असेल तर 'हा'आणि दुर आलेल तर 'तो' म्हणतो
--> पूर्वसंबंधाने ज्याच्याविषयी बोलायचे त्यासाठी ‘जो’ म्हणतात तर
ठाऊक नसेल तर कोण अथवा काय म्हणतात
*सर्वनाम हे संदर्भाने अर्थव्यक्त करते
व्याख्या :- नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणा-या
विकारी शब्दा सर्वनामा आसे म्हणतात.
*सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात
(A) पुरुषवाचक --- आपण,स्वतः
B) दर्शक-- --- तो,हा,
C)
संबंधी ---- जो. तो.
D) प्रश्नार्थक -- कोण, काय,
E) सामान्य किंवा अनिश्चित - कोण, काय,
F) आत्मवाचक -- आपण – स्वतः
· पुरुषवाचक एकवचन अनेकवचन,
प्रथम मी. आम्ही,
द्वितीय, तु तुम्ही,
तृतीय तो. ती. ते. ते.त्या,ती.
· दर्शक : हा,ही,हे, तो.ती. ते.
· संबंध :- जो,जी, जे,
ज्या,
· प्रश्नार्थक :- कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इ.
· सामान्य किंवा अश्वश्चितः- प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल
आली आहेत.हे निश्चिन सांगता येत नाही, तेंव्हा
त्यांना सामान्य नाम किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणतात.
1) कोणी केले ते माहीत नाही?--- प्रश्नार्थक
2) माझ्या मुठीत काय आहे ते सांगा पाहू.-- सामान्य किंवा अश्वश्चित सर्वनामे
A) पुरुषवाचक सर्वनाम :
" जे सर्वनाम पुरुषाचे दिग्दर्शन करते त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
उदा:- मी. तू, तो, आम्ही, तुम्ही, इ.
बोलणारा, ऐकणारा, ज्याच्या विषयी बोलण्यात येते तो तिसरा असे. तिघेच असतात. भाषणात तीन पुरुष आसतात . सर्वनामे ही तीन पुरुष वाचक असतात. - स्वत: व आपण यांना कोणी,आत्मवाचक सर्वनामे आसे म्हणतात.
# प्रथम पुरुषवाचक :- मी, आम्ही, स्वतः आपण
*द्वितीय पुरुषवाचक - तु, तुम्ही, स्वतः
* तृतीय पुरुषवाचक – तो,ती,ते,त्या हा,ही,हे.
1) मी पुस्तक वाचतो.--प्रथम - ए.व
2) आम्ही पुस्तक वाचतो - प्रथम - अ.व.
3) तु पुस्तक वाचतोस –द्वितीय ए.व.
4) तुम्ही पुस्तक वाचतां - द्वितीय, अ.व.
5) तो./हा पुस्तक वाचतो
6) ती ( ही ) पुस्तक वाचते -
7) ते(हे ) पुलक वाचते –
8) मी तुला आणि तिलाही घरी बोलवणार नाही. प्र.द्वि.पु. पु.
9) आपण आज शाळेत
जाणार नाही
10) आपण घरी कधी येणार? द्व.पू.
*********************************
B)
दर्शक सर्वनाम –
अगोदरच माहीत असलेली वस्तु मग ती
जवळची असो वा दुरची ती दाखविणारे जे सर्वनाम, त्यानां दर्शकसर्वनाम म्हणतात.
उदा:- हा, ही, हे हे.ल्या, ही, तो. ती, ते. ते, त्या, ती –
दर्शक सर्वनामामुळे वस्तु जवळची आहे की दुरची आहे हे कळून येते.
उदाः- हा वाघ, तो वाघ, ते घर, हे घर, ही पाटी, ती पाटी,
दर्शक सर्वनाम विशेषणाचेही काम करते.
उदा. तो मुलगा पडला.( विशेषणा)
ही गाय काळी आहे.( विशेषणा)
1) तो मुलगा अभ्यास करतो....
.( विशेषणा)
2) हा मुलगा बडबड्या आहे...( विशेषणा)
* तो हुशार आहे – (दर्शक सर्वनाम)
* तो पुस्तक वाचतो - पुरुषवाचक सर्वनाम
* तो हुशार आहे. .....दर्शक विशेषण,
(नामाच्या पूर्वी आलेल्या सर्वनामाला खरे दर्शक विशेषण आसे म्हणतात
* ती काटकसरी आहे.
* हा आळशी आहे.
***************************************
C) संबंधी सर्वनाम
सर्वनाम वाक्यात कधीही एकटे येत नाही
पूर्वी पाहिलेल्या वा माहीत आसलेल्या वस्तुशी जे
सर्वनाम नंतरचा संबंध प्रस्थापित करते त्याला संबंधी सर्वनाम म्हणतात.
उदाः-जो. जी, जे, जे ज्या, जी
· जो चोरी करतो,तो शिक्षा भोगतो. (या वाक्यात 'जो' या संबंधी सर्वनामामुळे तो या शिक्षा भोगणा-या व्यक्तीचा संबंध दाखविला गेला, म्हणून येथे जो, हे संबंधी सर्वनाम ठरले. यांचा संबंध नेहमीचाच असल्याने परस्परनित्य संबंधी सर्वनाम आसे म्हणतात.
· संबंधी सर्वनाम केवळ वाक्यात न येता मिश्र वाक्यात योते
1) जो काम करील, तो यश मिळवील.
जो हे सर्वनाम 'तो' शी संबंधित असल्याने काहींनी जो या
सर्वनाम परस्पर नित्यसंबधी
.. सर्वनाम आसे म्हटले आहे
2) जे चकाक ते सोने नसते
3) जी धावेल ती पहिली येईल
4) जो प्रेम करतो तो कवी होतो.
5) ज्यांने करावे त्याने भरावे.
*************************
D) प्रश्नार्थक सर्वनाम_-
कोण व काय इत्यादी प्रश्नांची ज्या सर्वनामाचा संबंध येतो, ते प्रश्नार्थक सर्वनाम होय"
उदा:
कोण, काय, कितीक, कित्येक, कोणाल कोणाला
* कोन चा संबंध माणसाशी आसतो.
उदा:- कोण बरे हा माणुस?
*काय चा संबंध वस्तुशी आसतो
उदा : ही
काय वस्तु आहे?
A) कोण बोलत आहे?
B) तुला काय सांगितले?
C) तू काय काय काम करशिल. ?
D) तू काय वाचतोस?
E) कोणाला गुण जास्त मिळाले?
F) तुला कधी बक्षीस मिळाले?
G) तिकडे कोण आहे. ?
H) तुझ्याकडे किती रुपये आहेत. ?
*प्रश्नार्थकसंबंधी सर्वनाम ओळखण्याची खुण- या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?)येते.*
**************************************
F.सामान्यसर्वनाम / अनिश्चित सर्वनाम:-
*-
कोणत्या नामाबद्दल
आले निश्चित सांगु शकत नाही.
“ज्या सर्वनामाचा वापर सामान्यपणे होतो त्याला सामान्यसर्वनाम म्हणावे.
*कोण, कोणी, आमुक फलाणा, भलता
*> सामान्यसर्वनामाचा अर्थ सामान्येकरून उपयोगात आणतात.
१) उदा :- कोणी काही बोलु नये.
*-
येथे कोणी म्हणजे सामान्यात: सर्वानीच असा घेण्यात येतो. एकादया विशिष्ट व्यक्तीला तो नाही.
*> वस्तुत: मुळ स्वरुपात 'कोण"
हेच सर्वनाम आहे. कारण 'कोणी' ला विभक्ति प्रत्यय लागत नाही.
*कोण - सर्वनाम आहे.
*कोणी-ला विभक्ति प्रत्यय नाही.
*> उलट कोण –ला लागतो जसे,
कोण कोणाचा, कोण- कोणाला, इ.
परंतु प्रचलित रुप मात्र
कोणी आसेच आहे.
*>"प्रथमेत नसुन तृतीयेत आहे, याला अनिश्चित सर्वनामही म्हणतात. कारण कोणाला नामाबद्दल आली आहेत. हे सांगता येत नाही.
*आत्मवाचक सर्वनाम वाक्यात एकटे येत नाही. त्याच्या आगोदर
नाम किंव्हा सर्वनाम येते.
************************************
F.आत्मवाचक सर्वनाम *
1)आपण सत्याग्रहात सामील होणार नाही:
2)आपण घरी केंव्हा आलात.
3) मी आपणहुन घरी गेलो.
4) मी स्वत: त्याला पाहिले.
5) तू स्वतः मोटार हाकशील का?
6) तो आपण होवून माझ्याकडे आला.
7) तुम्ही स्वत:ला काय समजता?
आपण या सर्वनामाचा अर्थ 'स्वत:' असा होतो तेंव्हा
ते आत्मवाचक सर्वनाम असते
आपण व स्वत: ही दोन्ही सर्वनाम पुरुषवाचकही आसतात. तेंव्हा
या दोहोंमध्ये फरक इतकाच की,
*
पुरुषवाचक आपण हे केवळ अनेकवाचनात येते येते.
*आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात
* पुरुषवाचक आत्मवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते..
*आत्मवाचक आपण तसे येत नाही.
आपण हे आम्ही व तुंम्ही या अर्थाने येते,तेंव्हा पुरुषवाचक होते.
स्वत: या अर्थाने येते ते आत्मवाचक सर्वनाम म्हणतात
- ती आपणहून घरी आली.
- राणीने स्वतः मानवला फोन केला.
- मी
स्वतः तिला पाहिले.
- ती स्वत:हुन मला भेटली.
x