1) 'ग' हा पुढीलपैक…….वर्ण आहे.
१) तालव्य 2) दंत्य 3) कंठ्य ४) ओष्ठ्य
2) 'औ' हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे ?
1) संयुक्त स्वर २) दीर्घ स्वर ३) मूळ स्वर ४) ऱ्हस्व स्वर
3) श्, ष्, स्, या वर्णांना काय म्हणतात ?
1) अनुनासिके 2) कठोर वर्ण 3) ध्वनी ४) उष्मे
4) मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनीला. ……. म्हणतात.
१) स्वर २) व्यंजन ३) शब्द 4) वर्ण
5) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात ?
1) देवनागरी 2) पाली ३) संस्कृत 4) मराठी
6) खालीलपैकी 'संयुक्त स्वर' ?
१) ल-प २) अ-आ ३) उ-ऊ 4) ए-ऐ
7) खालीलपैकी कोणते 'कठोर व्यंजन' आहे ?
1) त 2) ग 3) भ 4) व
8) पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. 'ह' ?
1) महाप्राण 2) अल्पप्राण 3) स्पर्श 4 ) अनुनासिक
9) 'नंदिनी' हा शब्द पर-सवर्णांनी लिहा.
1) नन्दिनी २) नण्दिणी ३) नज्दिनी 4) नम्दिनी
10) खालील शब्दांचे अचूक उच्चारस्थान शोधा : क आणि ख
1) तालव्य 2) कंठौष्ठ्य 3) कंठ्य ४) ओष्ठ्य
11) खालीलपैकी कोणते 'मृदू व्यंजन' दंत्य आहे ?
1) त २) छ 3)द ४) व
12) 'क्षुत्पिपासा' या शब्दाचा योग्य संधीविग्रह कोणता ?
१) क्षुधा : पिपासा २) क्षुद् + पिपासा
3) क्षुध् + पिपासा 4) क्षुत + पिपासा
13) 'चंद्रोदय' या शब्दाचा योग्य संधीविग्रह कोणता ?
१) चंद्र + ओदय 2)चंद्र + उदय
३) चंद्रो + उदय ४) चंद्रो + दय
14) खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण सांगा.
1) महीश २) इत्यादी ३) सैदव ४) उमेश
15) पुढील शब्दसंधीचा विग्रह करा- 'मात्रोपासना'
१) मातृ+उपासना २) मात्रा + उपासना
३) मात्र + उपासना ४) मा+त्रुपासना
16) 'प्रत्येक' या शब्दाची योग्य संधीफोड शोधा.
१) प्रत + एक 2) प्रति + एक
३) प्रत्य + एक ४) प्रती + एक
17) 'मनोरथ' या शब्दाची संधीफोड शोधा.
१) मन+उरथ २) मनः + रथ
३) मना + उरथ ४) मनः + उरथ
18) ‘निष्पाप’ या शब्दसंधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता?
१) सदाचार २) सच्चरित्र 3) दुष्काळ ४) सच्छील
19) खालीलपैकी कोणत्याही शब्दात 'उ' किंवा 'ऊ' पुढे सजातीय हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे ?
१)स्वल्प २) स्वस्त ३) स्वार ४) आस्वाद
20) 'तेज + निधी' या संधीविग्रहाचा योग्य संधी शोधा.
१) तेजः निधी २) तेजोनिधी ३) तेजनिधी ४) तेज्सनिधी
21) 'स्वल्प' या शब्दाचा संधीविग्रह ओळखा.
1) सु + अल्प २) स्व + अल्प ३) सो + ल्प ४) स्वल् + ल्प
22) 'गायन' या शब्दाचा संधीविग्रह ओळखा.
१) ग+ आयन 2) गै + अन ३) गाय + न ४) गौ+ आन
23) पुढील संधीविग्रह करा. 'हातून'
१) हात + उन २) हात + ऐन ३) हात + ऊन ४) हातू + न
24) 'मतैक्य' या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता ?
१) मत+एक २) मते + ऐक्य 3) मत + ऐक्य ४) मता+एक
25) ‘उत् + ज्वल' या विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता ?
1)उज्वल २) ऊज्वल 3) उज्ज्वल ४) उत्ज्वल